Tue. Sep 27th, 2022

साहित्य संमेलनात कोरोनाचा शिरकाव; पुण्याहून आलेले दोघे कोरोनाबाधित

कुसुमाग्रज नगरीच्या प्रांगणात सुरू असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या दिवशी पुण्याहून आलेले दोन प्रकाशक कोरोनाबाधित सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. या दोन कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची पालिकेकडून शोध मोहिम सुरू आहे.

आज मराठी साहित्य संमेलनाचा समारोप सोहळा आहे. साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वारावर कोरोना चाचणी करण्यात येते. या चाचणीमध्ये या दोन प्रकाशांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. आजच्या समारोपच्या दिवशी संमेलनात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. मात्र पुण्याहून आलेले दोन प्रकाशक कोरोनाबाधित असल्याचे समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

या दोन व्यक्तींना त्यांची तयारी असल्यास बिटको रुग्णालयामध्ये दाखल करण्यात येणार आहे. परंतु त्यांची तयारी नसल्यास त्यांच्यावर पुणे-पिंपरी चिंचवड पालिकेकडून नजर ठेवण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण

महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला आहे. दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या मुंबईतील डोंबिवलीमध्ये ३३ वर्षीय तरुणाला ओमायक्रॉन विषाणूची बाधा झाली असल्याचे समोर आले आहे.

धारावीतही ओमायक्रॉनचे सावट?

मुंबईतील धारावीमध्येही ओमायक्रॉनचा रुग्ण सापडल्याची माहिती समोर आली आहे. पूर्व आफ्रिकेतील टांझानिया येथून आलेला एक व्यक्ती धारावीमध्ये राहतो. या व्यक्तीचा कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. स्वॅब जिनोम सिक्वेंसिंगकरता कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळेत पाठवला आहे. याचा अहवाल अद्यापही प्रतिक्षेत आहे. तसेच या व्यक्तीच्या निकट संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी सध्या सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.