CoronaUpdates : मुख्यमंत्र्यांचा जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद, केलं ‘हे’ आवाहन

राज्यात कोरोनाचा धोका वाढत आहे. यानुसार आवश्यक ती खबरदारी सरकारकडून घेतली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनेतेशी थेट फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला आहे.
संशयित असल्यास डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करुन घ्या. अफवांवर विश्वास ठेवू नका. कोरोना रोखण्यासाठी दिलेल्या सूचनांचा पालन करा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्हद्वारे हे आवाहन केलं आहे.
सरकारी यंत्रणा जिवाची पर्वा न करत लढतायेत. राज्यात जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा पुरवठा आहे. लोकल रेल्वे आणि बेस्ट बसमधील गर्दी ओसरलीये. जनतेने घराबाहेर पडू नये. शासन काही सेवा बंद करू शकतं, पण तसे करण्याची सरकारची इच्छा नाही. असंही मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान राज्यातील कोरोनाचा आकडा वाढतोय. कोरोनाचे आज गुरुवारी राज्यात आतापर्यंत २ रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांचा आकडा ४७ वर पोहचला आहे.