Mon. May 17th, 2021

‘गोमुत्र आणि शेण कोरोनावर गुणकारी’, भाजप आमदाराचा विश्वास

जगभरात कोरोना व्हायरसची दहशत पसरलेली आहे. अशा परिस्थितीत भारतातदेखील त्यावर इलाज शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र आसाममधील भाजपा आमदाराने त्यावर उपचारदेखील शोधून काढले आहेत. गोमुत्र आणि गायीच्या शेणामुळे कोरोनाचा रूग्ण बरा होऊ शकतो, असा दावा भाजप आमदार सुमन हरिप्रिया यांनी केलाय.

कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) जगभरात भीतीचं वातावरण आहे. हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागलाय. कोरोनावर अद्याप इलाज आढळून आलेला नाही. त्यासाठी देशोदेशीचे डॉक्टर्स, शास्त्रज्ञ प्रयत्नशील आहेत. अशा परिस्थितीत आसाममधील भाजप आमदार ससुमन हरिप्रिया यांनी अजब दावा केला आहे. गोमुत्र आणि शेण कोरोनावर इलाज करण्यासाठी गुणकारी आहेत, असा दावा त्यांनी आसाम विधानसभेत केलं आहे.

सुमन हरिप्रिया यांनी आसामच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बांगलादेशी जनावरांच्या तस्करीवर चर्चा सुरू होती. या चर्चेमध्ये सुमन हरिप्रिया यांनी अजब विधान केलं. ‘शुद्धीकरणासाठी आपण कायम गोमुत्र शिंपडतो. गोमुत्रामध्ये दुर्धर रोग बरे करण्याची क्षमता आहे. त्यामुळे गोमुत्र आणि शेण कोरोना व्हायरसच्या उपचारांमध्ये गुणकारी ठरतील, असा माझा विश्वास आहे.’ असं विधान हरिप्रिया यांनी केलं आहे. त्यांच्या या विचित्र दाव्यामुळे पुन्हा नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *