Wed. Jun 16th, 2021

#Coronavirus छगन भुजबळ यांच्याकडून शासन निर्णयाला हरताळ

पुण्यात कोरोना व्हायरसचा उद्रेक होत असताना अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडूनच शासन निर्णयाला हरताळ फासला गेलाय. हडपसरच्या ससानेनगरमध्ये भुजबळांच्या हस्ते महापालिकेच्या शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आलं आहे.

राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेश ससाने हे कार्यक्रमाचे आयोजक होते. सरकारने शाळांना सुट्टी जाहीर केली असताना कार्यक्रमासाठी मुलं गोळा करण्यात आली होती. तरीही भुजबळांनी खासगी शाळेचा कार्यक्रम स्वीकारलाच कसा? असा सवाल उपस्थित केला जातोय.

पुण्यात आत्तापर्यंत कोरोनाचे तब्बल 15 रुग्ण आढळून आलेत. इतकं असूनही उद्घाटनाचा कार्यक्रम मात्र एवढ्या गर्दीतही शेवटी पार पडलाच. तर हा नियोजित कार्यक्रम यापूर्वी दोनदा पुढे ढकलल्याने कोरोनाची साथ असूनही हा कार्यक्रम नाकारू शकलो नाही, असा खुलासा छगन भुजबळ यांनी केलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *