Wed. Jun 16th, 2021

प्रवासाची माहिती लपवल्यास तबलिगी सदस्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश

तबलिगी जमातचा कार्यक्रम हा कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा हॉटस्पॉट बनला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे तबलिगीच्या सदस्यांनी १ मार्च २०२० पर्यंतच्या आपल्या प्रवासाची माहिती उघड करावी, असा आदेश छत्तीसगड येथील राजनंदगावचे जिल्हाधिकारी जे.पी.मौर्या यांनी दिला आहे. तसंच जर त्यांच्यापैकी कुणीही आपली माहिती लपवल्यास त्यांच्यावर थेट हत्येचा गुन्हा दाखल केला जाईल, असंही या आदेशात म्हटलं आहे.

दिल्लीच्या निजामुद्दिन येथे झालेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमात कोरोनाबाधित लोकांची हजेरी होती. या कार्यक्रमासाठी दिल्ली, छत्तीसगड, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा अशा विविध भागांतून लोक उपस्थित होते आणि कार्यक्रमानंतर ते आपआपल्या राज्यांत परतले. यामुळे विविध राज्यांत कोरोनाचा फैलाव झाला. तसंच काहीजणांचा मृत्यूही झाला. अशा परिस्थितीत ज्या काही लोकांनी क्वारंटाईन केलं गेलं, त्यांतील अनेकांनी डॉक्टरांना सहकार्य केलं नाही. डॉक्टरांवर थुंकण्यापासून ते उघड्यावर विष्ठा करण्यासारखे संतापजनक प्रकार क्वारंटाईन केंद्रात घडले.  

या पार्श्वभूमीवर तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला हजर असणाऱ्या लोकांनी स्वतःहून समोर यावं आणि आपली प्रवासविषयक माहिती उघड करावी, असा आदेश छत्तीसगडच्या राजनंदगावच्या जिल्हाधिकारींनी दिला आहे. या आदेशाचं पालन न करता माहिती सपवल्यास हत्येचा गुन्हा दाखल होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *