Mon. Aug 15th, 2022

कोरोना विषाणूमुळे MPSC च्या परीक्षा 31 मार्चपर्यंत स्थगित

कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातलं आहे. कोरोनामुळे जगात आतापर्यंत मृतांचा आकडा हा हजारोंच्या घरात पोहचला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर काळजी घेतली जात आहे.

कोरोनामुळे राज्य लोकसेवा आयोगाच्या (Maharashtra Public Service Commission) परीक्षा 31 मार्चपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत.

यासंदर्भात पत्र लिहिण्यात आले आहे. या पत्रात “राज्य शासनाने करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, १८९७ दिनांक १३ मार्च २०२० पासून लागू करून खंड २, ३ व ४ मधील तरतुदीनुसार अधिसूचना व नियमावली निर्गमित करण्यात आलेली आहे.”असं उल्लेख करण्यात आला आहे.

तसेच राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पत्र पाठवण्यात आलं आहे.

काय म्हटलंय पत्रात ?

करोना विषाणूचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून कोणत्याही कारणास्तव होणाऱ्या गर्दीस प्रतिबंध करण्यात आला आहे.

त्यामुळे ३१ मार्च २०२० पर्यंत आपल्या स्तरावरून घेण्यात येणाऱ्या विविध परिक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, असं या पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान वरळीचे आमदार आणि पर्यावरणमंत्री यांनीही यासंदर्भात ट्विट केलं आहे.

कोरोना इफेक्ट

देशात कोरोना रुग्णांचा आकडा 100 च्या पार गेला आहे. देशात सर्वाधिक म्हणजेच 33 कोरोना रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत.

राज्यात कोरोनामुळे अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मुंबईत 31 मार्च पर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

तसेच कोरोनामुळे राज्यातील शाळांनाही 31 मार्चपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.