#Coronavirus : राज्यातील पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द

#Coronavirus चा धोका लक्षात घेऊन राज्यातील पहिली ते आठवीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासंदर्भात आज शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेतली. नववी आणि अकरावीचे राहिलेले पेपर 15 एप्रिलनंतर घेण्यात येतील. तसंच 10वीचे शिक्षक सोडून इतर शिक्षकांना वर्क फ्रॉम होमची सूचना देण्यात आली आहे.