Mon. Sep 27th, 2021

इराकमधील कोविड रुग्णालयाला भीषण आग

इराक: इराकमधील दक्षिणेतील शहर नसीरियमधील एका रुग्णालयाच्या कोविड वॉर्डला भीषण आग लागली. रुग्णालयातील ऑक्सिजन टँकचा स्फोट होऊन भयंकर दुर्दैवी घटना घडली. ऑक्सिजन टँकच्या स्फोटानंतर रुग्णालयातील कोविड वॉर्डमध्ये भीषण आग लागली. कोरोनाच्या उद्रेकानंतर नसीरियात अल हुसैन कोविड रुग्णालय सुरू करण्यात आलं. या रुग्णालयातच भीषण आग लागली. या दुर्घटनेत दोन आरोग्य कर्मचाऱ्यांसह ४४ रुग्णांना प्राण गमवावा लागला. या घटनेत ६७ लोक जखमी झाले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. आगीच्या कारणाचा शोध घेण्यात आला. त्यावेळी ऑक्सिजन टँकचा स्फोट होऊनच आग लागल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलं.

आग लागल्यानंतर रुग्णालयात धावपळ उडाली. स्फोटामुळे आग लागलेली असताना क्षणाधार्थ आगीच्या लोळांनी कोविड वॉर्डला वेढा दिला. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना जळणारे मृतदेह बाहेर काढावे लागले. तर आगीमुळे सगळीकडे धूर पसरल्यानं अनेक कोविड रुग्णांना श्वास घेण्यासही त्रास सुरू झाला. दरम्यान या घटनेत मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *