Sat. Apr 17th, 2021

#Coronavirus : पुढील 15 दिवस राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे – उद्धव ठाकरे

‘कोरोना हे जागतिक संकट आहे. पहिल्या दुसऱ्या आठवड्यात हा प्रादुर्भाव झाला नाही तर तिसऱ्या आठवड्यात याचा प्रादुर्भाव जाणवायला लागला आहे. हे दिवस खूप महत्वाचे आहेत. पुढील 15 ते 20 दिवस राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.’ असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आहे.

‘Corona Virus चा जगभरात प्रादुर्भाव आहे. आधी हे संकट पुणे, पिपंरी-चिंचवडपर्यंत मर्यादित होतं. मात्र आता ग्रामीण भागातील शाळा, महविद्यालयं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.’ असं या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.

महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. प्रत्येक गोष्टीसाठी कायदा करणं शक्य नाही. त्यामुळे जनतेनेही स्वयंशिस्त पाळावी. रेल्वे, बसचा अनावश्यक प्रवास टाळा. धर्मिक स्थळांवर गर्दी करू नका. असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *