Fri. Aug 12th, 2022

शुभमंगल कोरोनापासून ‘सावधान’

प्रशासनाच्या सूचनांचे पालन न करता लग्न समारंभ करणे चांगलेच महागात पडले

कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले आसतांना देशभरात आणि राज्यातही नागरीकांनी कोरोनाची चांगलीच धास्ती घेतलीय. कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर याचा संसर्ग वाढू नये म्हणून सरकारही सतर्क आहे.

गर्दी कमी करण्यासाठी नागरीकांना आवश्यक त्या सूचना सरकारने दिल्या आहेत. गर्दी होईल असे सर्व कार्यक्रमही रद्द करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. प्रत्येक जिल्ह्यांतील प्रशासनाला तसे आदेश दिले आहेत.

सरकारचे आदेश आणि सूचनांचे पालन न करता अजूनही अनेक ठीकाणी गर्दीचे कार्यक्रम सुरूच आहेत. सध्या लग्नसराईचा हंगाम असल्याने कोरोनाची कोणतीही भीती न बाळगता लग्नाचे कार्यक्रमही धुमधडाक्यात सुरू आहेत. मात्र प्रशासनाच्या सूचनांचे पालन न करता लग्न समारंभ करणे चांगलच महागात पडलंय.

माजलगावमधील ब्रम्हगाव येथे एका लग्नसमारंभासाठी पाहुणे जमल्याची माहिती पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले यांना मिळाली . प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत लग्नस्थळी 100 – 125 लोक जमल्याची माहीती मिळाली.

यावरून डिसले यांनी शहर पोलिसांना लग्नस्थळी जाण्यास सांगितले. सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड सहकाऱ्यांसोबत लग्नस्थळी पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी कोरोना संसर्गाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशाची आठवण करून दिली व कोरोनामुळे गर्दी करता येणार नाही म्हणून जमलेल्यांना पाहुण्यांना परत जाण्यास सांगितले.

मात्र, तरीही लग्न लावण्याचा प्रयत्न उपस्थितांनी केला. त्यामुळे पोलिसांनी लग्न लावण्यास आलेले जवळचे नातेवाईक, भटजी, फोटोग्राफरसह आठ जणांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. या घटनेनं येत्या काही दिवसात ज्यांचे लग्न आहे अशा कुटुंबांची खळबळ उडालीय.

साताऱ्यातही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी लग्नसोहळा आयोजित करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करुन गर्दी जमविल्या प्रकरणी १३५ आणि १८८ कलमा अंतर्गत पोलिसांची ही कारवाई केलीय.

सातारा येथील खोजेवाडी गावात सुरु असलेल्या 2 लग्नसोहळ्यांवर अशीच कारवाई करत बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आलीय.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.