Wed. May 18th, 2022

#coronavirus : बेस्ट बस- उपनगरीय रेल्वेमध्ये औषध फवारणी

कोरोना विषाणू रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा हा १०८ च्या पार गेला आहे. तर राज्यात सर्वाधिक ३७ रुग्ण आहेत.

राज्य सरकारतर्फे कोरोना रोखण्यासाठी खबरदारीचे उपायांचा अवलंब केला जात आहे. तसेच बेस्ट आणि रेल्वे प्रशासनाने देखील कोरोना रोखण्यासाठी कंबर कसली आहे.

रेल्वे आणि बेस्ट प्रशासनाकडूनही बस आणि रेल्वे डब्ब्यांमध्ये निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.

उपनगरीय रेल्वे आणि बेस्ट ही मुंबईची लाईफलाईन आहे. दररोज अनेक लाखो मुंबईकर बस आणि रेल्वेने प्रवास करतात. मोठ्या प्रमाणात बस आणि रेल्वेमध्ये गर्दी असते.

त्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याची काळजीखातीर तसेच खबरदारीचा उपाय म्हणून निर्जंतुकीकरण केलं जात आहे.

पश्चिम रेल्वेने निर्जंतुकीकरण करतानाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. तसेच बेस्टने देखील फोटो ट्विट केले आहेत.

राज्यात करोनाग्रस्त रुग्णांची शहरनिहाय आकडेवारी

पुणे शहर – 16

मुंबई शहर – 8

ठाणे शहर – 1

कल्याण – 1

नवी मुंबई – 2

पनवेल – 1

नागपूर – 4

अहमदनगर -1

यवतमाळ – 2

औरंगाबाद – 1

दरम्यान राज्यातील जनतेने घाबरुन जाऊ नये, मात्र जागृक राहायला हवं, असं आवाहन राज्य सरकारतर्फे करण्यात आलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा-महाविद्यालयांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे.

मुंबईत ३१ मार्चपर्यंत जमावबंदी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.