Wed. Jun 16th, 2021

#Coronavirus : देश कम्युनिटी ट्रान्समिशनच्या टप्प्यावर जाण्यापासून वाचवण्यासाठी…

कोरोना व्हायरसचं संकट गंभीर असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या महसचिव लव कुमार यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. गेल्या २४ तासांत देशभरातून ९२ नवे कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे देशात आता कोरोनाबाधितांची संख्या आता १०७१ झाली आहे. कोरोनाचे आत्तापर्यंत २९ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर उपचारांनंतर ९९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सुदैवाने देश अजून कम्युनिटी ट्रान्समिशनच्या टप्प्यावर पोहोचलेला नाही. सध्या देश स्थानिक संसर्गाच्या टप्प्यावर आहे. त्यामुळे देशासाठी ही अत्यंत चिंतेची बाब आहे.  

सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचं १००% पालन करणं अनिवार्य असल्याचं लव कुमार यांनी म्हटलं आहे. या पालनात १ टक्का जरी कमी झाला, तरी पुन्हा शून्यापासून सगळी सुरुवात करावी लागेल, असं त्यांनी म्हटलं आहे. देशात कोरोना संसर्गाचं प्रमाण १०० ते १००० पर्यंत पोहोचण्यासाठी १२ दिवस लागले होते. त्यामुळे या रोगाचा संसर्ग लगेच पसरतो. त्यामुळेच देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये, यासाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *