Fri. Oct 22nd, 2021

#Coronavirus मुळे विवाह सोहळे आता ‘असे’

कोरोनाची दहशत आणि सरकारचे निर्देश बघता आता नागरिक सुद्धा त्याला प्रतिसाद देताना दिसून येत आहे. नागपूरच्या अण्णा बतकी यांच्या घरातील तसंच पुण्याच्या रास्ता पेठेतील आणि शुक्रवार पेठेतील अनेक कुटुंबातील विवाह सोहळ्यावर त्याचा परिणाम झाला. बतकी कुटुंबातील मुलीच्या लग्नाचा सोहळा धुमधडाक्यात ठरला होता. मात्र त्यांनी हा सोहळा घरच्या घरीच करण्याचा निर्णय घेतला आणि घरीच छोटेखानी कार्यक्रमाला सुरुवात केली.

अश्विनी बतकी हिचा लग्न सोहळा विशाल आणि धुमधडाक्यात करण्याचं नियोजन सगळ्या परिवाराने केलं होतं. जवळपास 600 पत्रिका वाटल्या. त्यात दुबईपासून तर मुंबई, पुण्याचे पाहुणे घरी येणार म्हणून लग्नासाठी मोठं लॉन बुक केलं. सगळी तयारी झाली.

मात्र हे सगळं नियोजन कोरोनामुळे पाण्यात गेलं. कोरोनाची निर्माण झालेली भीती आणि सरकारने कोरोना पसरू नये म्हणून केलेलं गर्दी टाळण्याचं आवाहन याला बतकी परिवाराने सकारात्मक प्रतिसाद दिला. लग्न सोहळ्याचं सगळं नियोजन बाजूला ठेऊन घरी टाकण्यात आलेल्या मांडवातच अगदी घरची मंडळी घेऊन लग्न लावण्याचा निर्णय घेतला. सगळ्या पत्रिका पाठविण्यात आलेल्या नातेवाईकांना फोन आणि मेसेज करून लग्नाला येऊ नका असं कळवण्यात आलं.

1700 लोकांच्या जेवणाची केटरिंगवाल्याला दिलेली ऑर्डर कॅन्सल करण्यात आली. लॉनचं कॅन्सल करण्यात आलं. लग्न सोहळा तर कॅन्सल करता येणार नाही म्हणून दोन्ही परिवाराने निर्णय घेतला आणि दोन्ही कडून जवळचे 25, 25 नातेवाईक असा हा सोहळा घरीच करण्याचं ठरवलं त्यातही कोरोनाच्या काळजीने सॅनिटायझरची व्यवस्थाही ताबडतोब करण्यात आली.

राज्यात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण पुण्यात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यानी सार्वजनिक कार्यक्रम, लग्न असे कार्यक्रम शक्य असल्यास पुढे ढकला किंवा कमी लोकांमध्ये करा असं आवाहन केलं होतं. याचं पालन करत शहरातील अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले.

आज होणारं एक लग्न दोन्ही कुटुंबातील लोकांच्या संमतीने पुढे ढकलण्यात आलंय. शहरात कोरोना विषाणू प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील कुटुंबाचे सकारात्मक पाऊल उचललं आहे. शुक्रवार पेठेत आज होणारा विवाहसोहळा पुढे ढकललाय. जमदाडे आणि कदम कुटुंब अडकणार होते. विवाहबंधनात गर्दी आणि सार्वजनिक कार्यक्रम न करण्याच्या सुचनेचे पालन केल आहे. कार्यालय आणि इतर आवश्यक सुविधा देणाऱ्यांची ही कुटुंबाला साथ मिळालीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *