Sun. Jun 20th, 2021

#Coronavirusinindia : ‘येथे’ बायोमॅट्रिक पद्धतीने हजेरी बंद

कोरोनाचा संभाव्य फैलाव टाळण्यासाठी साईबाबा संस्थानने अनेक उपाय योजना करण्यास सुरवात केली आहे. दक्षता म्हणून आजपासून बायोमेट्रिक दर्शन पास व्यवस्थेत बोटाचे ठसे घेण्याचे बंद केलं आहे. शिवाय कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक  हजेरी बंद केली आहे. मंदिरात भक्तांना लावलं जाणारा गंध आता चंदनाच्या काडीने लावलं जातंय.

साईबाबांच्या दर्शनासाठी रोज सरासरी पन्नास हजारावर आणि जास्तीतजास्त लाखावर भाविक येत असतात. गेल्या तेरा दिवसाची आकडेवारी बघितली असता चाडे चार लाख भाविकांनी शिर्डीच्या साई मंदीरात येऊन दर्शन घेतलंय. या वर्षी करोनाची भीती असतांनाही गेल्या वर्षीपेक्षा या तेरा दिवसांत तब्बल दहा हजाराहून अधिक भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. यामुळे भक्तांच्या आरोग्याच्या दृष्टीने साई संस्थान प्रशासनाने अनेक उपाय केले आहेत.

शिर्डीला येणाऱ्या भाविकाला मंदिरात जातांना बायोमॅट्रीक पध्दतीने बोटाचा ठसा देऊन पास घ्यावा लागतो. एकाच मशीनवर वारंवार भक्तांचे हात लागत असल्याने येत्या 31 मार्च पर्यंत हे बोटांचे ठसे घेण्याचं साई संस्थानने बंद केलंय. याच बरेबरीने कर्मचाऱ्यांच्या हजेरीचंही थम्ब इम्प्रेशन घेणं बंद करण्यात आलंय. मंदिर परीसरात भक्तांची इन्फ्राररेड थर्मा मिटरने तपासणीही केली जातेय.

अनेक ठिकाणी भाविकांना हात स्वच्छ करण्यासाठी सॅनीटायझर ठेवण्यात आले आहेत. अनेक भक्त याचा वापर करत आहेत. साई मंदिरात येणाऱ्या भक्तांना चंदनाचा टिळा कर्मचाऱ्यांकडून हाताच्या बोटाने लावला जातो, तो आता चंदनाच्या काडीने लावण्यात येणार आहे. या व्यतीरीक्त साई संस्थानच्या सर्वच ठिकाणाच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जातेय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *