Mon. Jul 26th, 2021

बाप रे! भर सभेत नगरसेवकाचं स्थायी सभापतीला चुंबन

ताराराणी आघाडीच्या नगरसेवकाने काँग्रेसचे गटनेते, स्थायी सभापती शरंगधार देशमुख यांचं चक्क भर सभेत चुंबन (Kiss) घेतलं. अचानक घडलेल्या या प्रकाराने सभागृहात हस्यकल्लोळ उडाला. (Corporator kisses chairperson)

महिला नगरसेविका सभागृहात असताना त्यांनी केलेल्या या कृत्यामुळे उलट सुलट चर्चा सुरू होत्या.

मात्र ताराराणी आघाडीकडून आपणाला डावलले जात असून देशमुख यांच्याकडून मात्र प्रेमाची वागणूक मिळत असल्याने भावनेच्या भरात हे कृत्य केल्याचं नगरसेवकाने नमूद केलं.

दरम्यान या सभेत अडीच महिन्यापूर्वी महापौर झालेल्या राष्ट्रवादीच्या सुरमंजिरी लाटकर यांनी राजीनामा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *