Wed. Oct 5th, 2022

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप नगरसेवकाची धारदार शस्त्रांनी हत्या

जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी

आळंदी नगरपरिषदेचे नगरसेवक बालाजी कांबळे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात बालाजी कांबळे यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना वडमुखवाडी येथे आज दुपारी चारच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी नगरपरिषदेचे भाजपाचे नगरसेवक बालाजी कांबळे वडमुखवाडी येथे आले असता अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्याने डोक्यात वार करून गंभीर जखमी केले होते. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले आहे.

नागरिकांनी कांबळे यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पिंपरी-चिंचवडमध्ये एका आर्किटेक्टकडे बालाजी कांबळे आले होते. पुढे ते पुण्याला गेल्याचं बोललं जातंय, तिथून परतत असताना हा हल्ला झाल्याची माहिती त्यांच्या मित्रांनी दिली. पण त्यांच्यासोबत कोण होतं? तसंच हल्ल्याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

कोण होते बालाजी कांबळे ?

  • बालाजी कांबळे आळंदी नगरपरिषदेचे भाजपचे नगरसेवक 
  • ते पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आले होते.
  • त्यांचा छोटेखानी बांधकामाचा व्यवसाय होता.

पिंपरी-चिंचवड: किरकोळ वादातून एकावर गोळीबार

पिंपरी-चिंचवडमध्ये पाणी-पुरवठा बंद

पिंपरीत आज कोरडा दिवस

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.