Thu. Sep 29th, 2022

‘भ्रष्टाचार आणि घराणेशाही ही देशाला लागलेली कीड’

७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने पंतप्रधान मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण पार पडला. यावेळी देशाला संबोधित करत असताना पंतप्रधान मोदींनी भ्रष्टाचार आणि घराणेशाही संपुष्टात आणण्यासाठी निर्धार केला आहे.

‘भ्रष्टाचार करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी आता आपल्याला एक समाज म्हणून एकत्र येणे गरजेचं आहे.  भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्या दंड ठोठावण्यासाठी आपल्याला एकत्र येणे गरजेचं आहे. भ्रष्टाचार आणि घराणेशाही हे देशाला लागलेली कीड आहे. जिथे देशभरात गरीब लोक जगण्यासाठी लढत आहे, तिथे आपल्याला भ्रष्टाचाराविरोधात पूर्ण ताकदीने लढावे लागणार आहे’ असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

भ्रष्टाचार करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी आता आपल्याला एक समाज म्हणून एकत्र येणे गरजेचं आहे.  भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्या दंड ठोठावण्यासाठी आपल्याला एकत्र येणे गरजेचं आहे. जोपर्यंत या भ्रष्टाचारी लोकांना शिक्षा देण्याची आपली मानसिकता होणार नाही, तोपर्यंत राष्ट्राची प्रगती होणार नाही. आपल्या अनेक संस्था या घराणेशाहीमुळे प्रभावित आहे. हे आपल्या देशाची प्रतिभा, राष्ट्राची क्षमतेला नुकसान पोहोचवत आहे आणि भ्रष्टाचाराला जन्म देत आहे, अशी टीका  मोदींनी केली.

आज आपल्याला दोन मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. भ्रष्टाचार आणि घराणेशाही, भाऊ- भाच्याचे राजकारण सुरू आहे. भ्रष्टाचार ही देशाला लागलेली कीड आहे. आपल्याला त्याविरोधात लढावे लागणार आहे. आपल्याला आपल्या संस्था आणखी ताकदवर कराव्या लागणार आहे, आपली योग्यता ओळखून पुढे जाण्यासाठी घराणेशाहीविरोधात जागरूकता दाखवावी लागणार आहे, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी गांधी घराण्यावर निशाणा साधला.

2 thoughts on “‘भ्रष्टाचार आणि घराणेशाही ही देशाला लागलेली कीड’

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.