कॉसमॉस बँक सायबर हल्ला: दोघांना अटक, आणखी पाच नावे निष्पन्न
पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावरील कॉसमॉस बँकेच्या एटीएम स्वीच (सर्वर) वर सायबर हल्ल्याप्रकरणी दोघांना अटक, आणखी पाच जणांची नावे निष्पन्न आहेत.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. अटक आरोपींना आज पुणे न्यायालयात हजर केले असता त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या हल्ल्यात तब्बल 94 करोड 42 लाख रुपये चोरल्याचा प्रकार 11 ऑगस्ट रोजी घडला होता.
पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने याप्रकरणी कारवाई करत आहेत. सध्या याप्रकरणी दोघांना आज दुपारी अटक केली तर आणखी पाच जणांची नावे निष्पन्न झाली असून त्यांचा शोध सुरु आहे. चतु:शृंगी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
या सर्वांनी कोल्हापुरातील विविध बँकातून 95 कार्डचे क्लोन करून तब्बल 89 लाख 47 हजार 500 रुपये काढल्याचे निष्पन्न झाले आहे.
फहिम मेहफुज शेख (वय-27) आणि फहिम अजीम खान (वय-30) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर महेश राठोड, कुणाल, अली, मोहंमद आणि अॅन्थनी या पाच जणांची नावे निष्पन झाली असून त्यांचा शोध सुरू आहे.