Tue. Aug 20th, 2019

कोस्टल रोडच्या कामासाठी सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील

0Shares

महापालिका आणि शिवसेनेचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडचे काम थांबवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. कोस्टल रोड मुळे ब्रिचकँडी येथिल टाटा उद्यान नामशेष होणार आहे.तसेच मच्छिमारांवर उपासमारीची वेळ येईल या कारणामुळे उच्च न्यायालयाकडून हे आदेश देण्यात आले होते. हे बांधकाम थांबवणे हे लोकांसाठी गैरसोयीचे असल्याचे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने पालिकेला  पावसाळ्याच्याआधीच बांधकाम सुरु करण्याची परवानगी दिली आहे.

न्यायालयाने स्थगिती हटवली

दक्षिण मुंबईतील मरिन ड्राइव्हपासून कांदिवलीपर्यंत कोस्टल रोड उभारण्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे.

मासेमारी तसेच पर्यावरणावर याचा वाईट परिणाम होतोय अशा याचिका याविरोधात दाखल करण्यात आल्या होत्या.

या याचिकेवर २३ एप्रिल रोजी कोस्टल रोडच्या कामास दिलेली स्थगिती उठवण्यास न्यायालयाने नकार दिला होता.

या निर्णयाविरोधात मुंबई महानगर पालिकेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

याच सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यालयाने समुद्रात भर न टाकण्याच्या अटीवर महापालिकेला या कामासाठी हिरवा कंदील दिला आहे.

या प्रकल्पाविरोधातील इतर सुनावण्या जून महिन्यामध्ये होणार आहेत .

हे बांधकाम थांबवणे हे लोकांसाठी गैरसोयीचे असल्याचे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने पालिकेला पावसाळ्याच्याआधीच बांधकाम सुरु करण्याची परवानगी दिली आहे.

कोस्टल रोडचे काम थांबविण्याचे कारण काय?

यामुळे मासेमारीवर परिणाम होणार असल्याने वरळीतील मच्छिमारांनी या प्रकल्पाला विरोध करत याचिका दाखल केली.

यामध्ये टाटा गार्डन परिसरातील दोनशे झाडांचा अडथळा असल्याने ती तोडण्याचा प्रस्ताव पालिकेने ठेवला आहे.

यामुळे कोस्टल रोडमुळे भावी पिढ्यांना पक्षी पाहायला मिळणार नाहीत असं ही सांगण्यात आलं आहे.

अशा याचिका दाखल करण्यात आल्याने या कामाला स्थगिती देण्यात आली होती.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *