Fri. May 7th, 2021

1 कप चहा, किंमत 2000 रुपये! कारण…

चहा म्हणजे बहुतांश भारतीयांचं लाडकं पेय… चहा हा जरी देशाबाहेरून आलेला प्रकार असला, तरी आता तो चांगलाच भारतीय बनला आहे. दार्जिलिंग आणि आसम भागांमध्ये चहाचे मळेही आहेत. अनेकांची सकाळ चहाशिवाय सुरूच होत नाही. त्यातही कुणाला कडक चहा लागतो, कुणाला दूध जास्त असणारा चहा लागतो. हल्ली तर ब्लॅक टी आणि ग्रीन टीचीही चांगलीच क्रेझ आहे. कॉफी शॉप्सपेक्षाही चहाच्या टपरीवर लोकांची जास्त गर्दी असते. इथे कटिंग चहाची ऑर्डर सतत चालूच असते. चहाची किंमतही खरी फार नसते. त्यामुळे चहा अगदी कोणत्याही वेळी आणि कितीही पिण्याची पद्धत लोकांमध्ये असते. पण एक चहा असा आहे, की जो जगातला सर्वांत महाग चहा म्हणून ओळखला जातो…

जगातला सर्वांत महाग चहा!

‘व्हर्जिन व्हाईट टी’ चहा हा जगातला सर्वांत महाग चहा म्हणून ओळखला जातो.

येथील 1 कप चहाची किंमत 2000 रुपये इतकी असते.

श्रीलंकेच्या गॉल येथे या चहाची लागवड केली जाते.

या चहाची पानं तोडण्याचीही वेगळी पद्धत आहे.

या पानांना हात लावत नाहीत.

ही पानं वाळल्यावर पांढरी होतात.

त्यामुळे हा चहा इतर सामान्य चहांसारखा नसतो, हे तर तुम्हाला समजलंच असेल. आता त्याची चव घेण्यासाठी 1 कप चहासाठी 2000 रुपये मोजायची तयारी मात्र हवी.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *