Sat. Oct 16th, 2021

देशातील कोरोना रुग्णसंख्येत ३ टक्क्याने वाढ

देशात गेल्या २४ तासांत ५० हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद, तर सक्रिय रुग्णसंख्या ६ लाखांहून अधिक. गेल्या २४ तासांत ५४,०६९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर १३२१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी मंगळवारी ५०,८४८ नव्या बाधितांची नोंद करण्यात आली होती. तसेच गेल्या २४ तासांत ६८,८८५ लोक कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. परंतु, धोका अद्याप टळलेला नाही. देशात पुन्हा एकदा ५०
हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ५४,०६९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर १३२१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी मंगळवारी ५०,८४८ नव्या बाधितांची नोंद करण्यात आली होती. तसेच गेल्या २४ तासांत ८६,८८५ लोक कोरोनामुक्त झाले आहेत.

देशात सलग ४२ व्या दिवशी कोरोनाबाधितांच्या नव्या रुग्णांहून अधिक कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा आहे. २३ जूनपर्यंत देशभरात ३० कोटी १६ लाख कोरोना लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात ६४ लाख ८९ हजार लसीचे डोस देण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत ३९ कोटी ७८ लाखांहून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात १९ लाख कोरोना सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले आहेत. ज्याचा पॉझिटिव्हिटी रेट ३ टक्क्यांहून अधिक आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *