जमिनीच्या वादाला कंटाळून पाच वर्षाच्या मुलीसह दांम्पत्याची आत्महत्या

जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वाकळण गावात घडली आहे. त्यामुळे वाकळन गावावर मोठी शोककळा पसरली आहे.
ग्रामीण भागात जमिनींना सोन्यापेक्षा अधिक भाव असल्याने स्थानकांमध्ये मोठे वाद सुरू झाले आहेत. कल्याणमधील वाकळन गावात राहणारे शिवराम पाटील यांचे देखील त्यांच्या कुटुंबियांसोबत जमिनीचे वाद मागील काही दिवसांपासून सुरू होते.
मात्र हे वाद सुटत नसल्याने आणि सततची भांडणं याला कंटाळून त्यांनी आपल्या पत्नीसह पाच वर्षांच्या मुलीला घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी आपल्या भांडणाची माहिती देखील चिठ्ठीत लिहून ठेवली आहे.
त्यामध्ये तब्बल तेरा ते चौदा जणांची नावे असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी कुटूंबियांनी केली आहे. घटना घडल्यानंतर आरोपींनी गावातून पलायन केले असून त्यांना अजून अटक झाली नाही.
यामुळे या जागेच्या वादाच्या प्रकरणात तीन जणांचे जीव जाऊन देखील आरोपी पोलिसांना सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
ग्रामीण भागात जमिनीचे वाद हे अत्यंत विकोपाला गेले आहेत. त्यामुळे पाटील यांनी आत्महत्या करण्याआधी लिहिलेली चिठ्ठी आणि आपल्या नातेवाईकांना मेसेज करून आत्महत्या करत असल्याची माहिती दिली होती.
मात्र नातेवाईक घरी पोहचेपर्यंत त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली होती. त्यामुळे आता पाटील यांच्या आत्महत्येला दोषी असलेल्यांना पोलीस कधी बेड्या ठोकणार असा प्रश्न सध्या नातेवाईकांना पडला आहे.