Fri. Aug 12th, 2022

ताजमहाल प्रकरणी याचिकेवर न्यायालयाची टिप्पणी

आग्रा येथील ताजमहालमधील २२ बंद खोल्या उघडण्याची याचिका न्यायालयाने फेटाळी आहे. ताजमहाल प्रकरणी याचिकेवर न्यायालयाने टिप्पणी दिली असून आधी ताजमहालचा अभ्यास करा, मग आमच्याकडे या. तसेच आज ताजमहालच्या खोल्या उघडा म्हणणारे उद्या न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये घुसतील, अशी टिप्पणी न्यायालयाने दिली आहे.

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने याचिकाकर्त्यांना ताजमहालच्या २२ खोल्या उघडण्यासंदर्भात प्रश्न विचारले आहेत. तसेच याचिकाकर्त्याला जनहित याचिकेचा गैरवापर करू नये असेही न्यायालयाने सांगितले आहे. याप्रकरणी आज सुनावली पार पडली असून याचिकाकर्त्याला ताजमहालचा अभ्यास करण्यास सांगितले आहे. तसेच आज ताजमहालच्या खोल्या उघडा म्हणणारे उद्या न्यायाधीशांच्या चेंबरमध्येसुद्धा घुसतील, असे म्हणतही न्यायालयाने याचिकाकर्त्याला फटकारले आहे.

काय म्हटलंय याचिकेत?

लखनऊ खंडपीठात ताजमहलमधील २२ बंद खोल्या उघडण्यात येण्याबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. लोकांना २२ बंद खोल्यांमध्ये काय आहे याबाबत माहिती मिळण्यामागचा हेतू या याचिकेमागे आहे. दरम्यान, याचिकाकर्त्यांना याचिकेत आरटीआय दाखल करून २२ खोल्यांची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला आहे, तसेच २२ खोल्या का बंद केल्या आहेत, असा युक्तिवाद  करण्याता आला. मात्र, याचिकाकर्त्याचे समाधान न झाल्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.