Sun. Sep 19th, 2021

2007 हैदराबाद बॉम्बस्फोट प्रकरण: दोन आरोपी दोषी अन्य दोन दोषमुक्त

हैदराबादमध्ये 2007 मधील दुहेरी बॉम्बस्फोटाप्रकरणी न्यायालयाने दोन जणांना दोषी ठरवलं आहे.

तब्बल 11 वर्षानंतर या स्फोटातील पीडितांना आज न्याय मिळाला आहे. अनिक शफिक सईद आणि इस्माइल चौधरी या दोघांना कोर्टाने दोषी ठरवलं असून अन्य दोन आरोपींना न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी दोषमुक्त केले आहे.

  • हैदराबाद येथे 2007 साली दोन साखळी बॉम्बस्फोट घडविण्यात आले होते.
  • या स्फोटात 42 नागरिकांचा जीव गेला होता, तर 50 पेक्षा जास्त जखमी झाले होते.
  • हैदराबादच्या मध्यवर्ती कोटी परिसरात असलेल्या प्रसिद्ध गोकुळ चाट येथे पहिला स्फोट घडविण्यात आला होता.
  • तर येथील पर्यटनस्थळ असलेल्या ल्युंबिनी पार्क येथे दुसरा स्फोट घडवून आणला होता.
  • तर स्फोटानंतर पोलिसांनी जिवंत स्फोटकही हस्तगत केली होती.
  • दरम्यान, इंडियन मुजाहिद्दीनचा संस्थापक रियाज भटकळ आणि इकबाल भटकळ हे दोघे या स्फोटाचे मास्टरमाईंड होते. अद्यापही हे दोघे फरारच आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *