Thu. Jan 27th, 2022

राजधानीत कोरोनाचा कहर सुरूच

देशभरात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. राजधानीत कोरोनाचा कहर सुरूच आहे. दिवसेंदिवस हा कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. यामुळे देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यानं दिल्लीत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत सहा दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली आहे. शिवाय अरविंद केजरीवाल यांनी राज्यातील जनतेला संबोधित करताना लॉकडाउन लावत असल्याचं सांगितलं आहे. सोमवारी रात्री १० पासून लॉकडाउनच्या अमलबजावणीला सुरुवात होईल तसेच या दरम्यान कोणीही दिल्ली सोडून जाऊ नका असं आवाहन अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे.

 

जनतेला संबोधित करतांना त्यांनी सांगितलं आम्ही चाचण्या कमी केल्या नाहीत तर वाढवल्या. दिल्लीत रोज १ लाख चाचण्या होत आहे. आम्ही मृत्यूचे आकडेही लपवले नाहीत. आम्ही आत्तापर्यंत कधीही खोटं बोललो नाही. जी परिस्थिती आहे ती नेहमीच जनतेसमोर ठेवली. दिल्लीत गेल्या २४ तासात २३ हजार ५०० रुग्ण आढळले आहेत. दिवसाला २५ हजार रुग्ण मिळत असतील तर आरोग्य व्यवस्था ढासळेल. दिल्लीत १०० पेक्षी कमी आयसीयू बेड आहेत. ऑक्सिजनसाठी केंद्र सरकारला पत्र लिहिलं आहे. एका खासगी रुग्णालयाने तर रात्री तीन वाजता ऑक्सिजन संपला होता असं सांगितलं. मात्र वेळीच उपलब्ध झाल्याने खूप मोठी दुर्घटना टळली. औषधांचा तुटवडा जाणवत आहे. या सर्व गोष्टी पाहता दिल्लीमध्ये परिस्थिती गंभीर आहे. दिल्लीमध्ये आतापर्यंत आपण परिस्थिती चांगली हाताळली आहे. दिल्लीतील आरोग्य व्यवस्था सध्या सीमेवर आहे. कोणत्याही यंत्रणेच्या आपल्या मर्यादा आहेत,” असं केजरीवीलांनी म्हटलं.

 

दिल्लीमध्ये आणखी रुग्णांना दाखल करून घेणं शक्य नाही आणि लॉकडाउनला पर्याय नाही असं लक्षात आळं आहे. आज रात्री दहा ते पुढील सोमवार संध्याकाळी सहा वाजेपर्यंत लॉकडाउन राहणार आहे. यावेळी मेडिकल, खाण्यापिण्याची दुकानं सुरू राहतील. काय सुरू राहणार व काय बंद यासंबंधी सविस्तर माहिती लवकरच जाहीर करू,” असं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे. हा निर्णय अत्यंत दु:खानं घ्यायला लागत आहे. आपलं दिल्ली एक कुटुंब आहे. कुटुंबावर संकट आलं की सगळे मिळून त्याचा सामना करतात. आताही आपण सर्व मिळून याचा सामना करु,” असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे. दिल्लीतील परिस्थिती ही दिवसेंदिवस गंभीर होत असल्यानं हा निर्णय अरविंद केजरीवाल यांनी घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *