Wed. Jun 16th, 2021

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी!

मुंबई: मुंबईमध्ये मंगळवारी ८३१ नवीन कोरोनारुग्णांची नोंद झाली आहे. तर ५ हजार ८६८ रुग्ण कोरोमुक्त झाले आहेत. त्याचप्रमाणे मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या १७ हजार ३२८ इतकी झाली असून रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर पोहचला आहे.

मुंबई महापालिकेने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत केलेल्याउपाययोजनांमुळे कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांपासून कमी होताना दिसत आहे.

मंगळवारी मुंबईत २३ रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत एकूण १४ हजार ९०७ जणांनी आपला जीव गमावला आहे. मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्क्यांवर पोहचले असून रुग्णवाढीचा दर ०.१५ टक्के इतका कमी झाला आहे तर रुग्ण दुपटीचा कालावधी ४५३ दिवसांवर गेला आहे.

देशातील कोरोना रुग्णांची संख्या घटली

गेल्या काही दिवसांपासून भारतात दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या घटली असून मंगळवारी १ लाख ३२ हजार ७८८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ३२०७ कोरोना रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. नव्या करोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *