Jaimaharashtra news

पालकांसाठी दिलासादायक बातमी! १२ ते १८ वयोगटातील मुलांचेही लसीकरण होणार

भारतातील लसीकरण मोहिमेला आता आणखी वेग येणार असून देशातील १२ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांचं लवकरच लसीकरण केलं जाणार आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना लस मिळणार आहे. ही लस आधी गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या मुलांना दिली जाईल.

डीसीजीआयकडून यासाठीची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून झायडस कॅडिला ही लस मुलांना देण्यात येणार आहे. गंभीर आजार असलेल्या मुलांची यादी तयार केली जाणार असून या मुलांना लसीकरणामध्ये प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच तीन डोस असलेली ‘झायकोव्ह-डी’ लस मुलांना देणार असल्याची माहिती एनटीएजीआयचे प्रमुख एन. के. अरोरा यांनी दिली आहे.

Exit mobile version