Thu. May 6th, 2021

देशातील कोरोना रुग्णसंख्येत भयावह वाढ

देशभरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. देशात गेल्या २४ तासात कोरोनाच्या २.१७ लाख नव्या रुग्णांची नोंद झाली असून ११८५ रुग्णांना आपला प्राण गमवावा लागला आहे. गेल्या २४ तासात १.१८ लाख रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. या आधी, बुधवारीही दोन लाखांच्या वर कोरोनाच्या रुग्णसंख्येत भर पडली होती. त्यामुळे देशातली परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत असल्याचं दिसून येत आहे.

आता एकूण रुग्णसंख्या १.४२ कोटी झाली आहे.१.२५ रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली असून सध्या १५ लाख ६९ हजार ७४३ सक्रीय रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत १.७४ लाख लोकांचा मृत्यू झाला असून एकूण ११ कोटी ७२ लाख २३ हजार ५०९ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. देशातील कोरोनाचा मृत्यूदर हा 1.23 टक्के आहे तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ८८ टक्के आहे. एकूणसक्रीय रुग्णांमध्ये वाढ झाली असून ती १० टक्क्याहून जास्त आहे. कोरोनाच्या सक्रीय रुग्णसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात तिसरा क्रमांक आहे, तर एकूण रुग्णसंख्येच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

महाराष्ट्रात गुरुवारी ६१,६९५ नवीन रुग्णांची भर पडली आहे तर ५३,३३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.३ टक्के एवढे आहे. राज्यात गुरुवारी ३४९ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील कोरोना मृत्यूदर १.६३ टक्के एवढा आहे. राज्यात एकूण ६,२०,०६० सक्रिय रुग्ण आहेत.मुंबईमध्ये गुरुवारी कोरोनाच्या ८,२१७ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामध्ये ४९ रुग्णांचा मृत्यू झाला होता. मुंबईमध्ये आता एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही पाच लाख ५३ हजार १५९ इतकी झाली असून मृतांची एकूण संख्या ही १२,१८९ वर पोहोचली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *