Thu. Jun 17th, 2021

देशातील कोरोनाची स्थिती चिंताजनक

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेली परिस्थिती अद्याप कायम असून रुग्णसंख्या एकीकडे कमी होत असताना मृत्यूंचं प्रमाण चार हजारांच्या पुढे आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून शनिवारची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारतात शनिवारी ३ लाख ११ हजार १७० नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ३ लाख ६२ हजार ४३७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात ३६ लाख १८ हजार ४८५ रुग्ण उपचार घेत आहेत. तर ४,०३७ रुग्णांना करोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत.

देशातील एकूण मृत्यूंपैकी ९६० मृत्यू हे महाराष्ट्रातील आहेत.महाराष्ट्रातील रुग्णसंख्या कमी होताना दिसत असली तरी मृत्यूदर वेगाने वाढत आहे. महाराष्ट्रात शनिवारी ५९ हजार ७३ रूग्ण कोरोनातून बरे झाले,तर, ३४ हजार ८४८ नवीन बाधित आढळून आले. देशात रुग्ण बरे होण्याचा दर हा ८३.८३ टक्के इतका झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *