Wed. Oct 27th, 2021

पोलिसांसाठी सुसज्ज कोरोना उपचार केंद्र

पोलीस दलाने अधिकारी, अंमलदारांसह त्यांच्या कुटुंबीयांसाठी कलिना, कोळे कल्याण वसाहतीत सुसज्ज कोरोना उपचार केंद्र सुरू केले आहे. या केंद्रात एकूण २५६ खाटा आहेत. त्यापैकी २८ ऑक्सिजन खाटा आहेत. विशेष म्हणजे या केंद्रातील ५० खाटा महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.

मंगळवारी केंद्र सुरू झाले. पहिल्याच दिवशी दोन अधिकारी आणि सहा अंमलदारांना केंद्रात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. गेल्या वर्षी पोलीस दलात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढू लागल्यानंतर कोळे कल्याण पोलीस वसाहतीतील अधिकाऱ्यांच्या निवासासाठी उभारलेल्या इमारतीत अशा प्रकारचे केंद्र उभारण्यात आले होते. मात्र लक्षणे नसलेल्या किंवा अगदीच किरकोळ स्वरूपाची कोरोनाची बाधा असलेल्यांवर या केंद्रात उपचार करण्यात आले. हे केंद्र अन्य इमारतीत सुरू करण्यात आले असून त्यात ५८ वर्षे वयापर्यंत, सहव्याधी असलेल्यांनाही उपचार मिळतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *