Sun. Jun 20th, 2021

ठाण्यात लसीकरण ठप्प

ठाणे: देशात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे लसीकरण मोहीम सुद्धा चालू आहे. मात्र अनेक ठिकाणी लसीचा तुटवडा असल्याचं पाहायला मिळत आहे.

ठाणे महानगरपालिकेकडून होणारे लसीकरण आज बंद राहणार आहे. लसीचा साठा अपुरा असल्याने आजचे लसीकरण बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठाण्याचे महापौर नरेश मस्के यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. नरेश म्हस्के यांनी काल संध्याकाळी उशिरा ट्विट केल्याने नागरिकांची आज लसीकरण केंद्रावर येऊन विचारपुस करत असल्याचं चित्र पाहायला मिळालं.

संपादन: सिद्धी भरत पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *