ऑगस्टपर्यंत कोविड लसीच्या उत्पादनात दुपटीने वाढ

येत्या ऑगस्टपर्यंत कोविड-१९ विरोधी लसीच्या उत्पादनात दुप्पटीने वाढ करून दरमहा १४० दशलक्ष डोसची निर्मिती करण्याचे नवे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे.

उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, आरोग्य मंत्रालय आणि जैवतंत्रज्ञान विभागाच्या वतीने एक सादरीकरण नुकतेच पंतप्रधानांना देण्यात आले. त्यात हे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या दोन कंपन्या संयुक्तरीत्या हे उद्दिष्ट पूर्ण करतील. त्यांना नियामकीय, तसेच कार्यवाहीच्या स्वरूपातील मदत भारत सरकारकडून केली जाईल.

पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया सध्या कोविशिल्ड लसीच्या ६० दशलक्ष डोसची निर्मिती दरमहा करीत आहे. तर भारत बायोटेक आपल्या कोव्हॅक्सिन लसीच्या ४ दशलक्ष डोसची निर्मिती दरमहा करते.

Exit mobile version