Tue. Dec 7th, 2021

गडचिरोलीत पावसात 25 बैलांचा मृत्यू

अहेरी तालुक्यातील देवलमारी येथे तब्बल 25 बैल दगवल्याची घटना देवलमरी येथे घडले असून आज पहाटे सदर घटनेची माहिती शेतकऱ्यांना मिळाली.

अहेरी तालुक्यातील देवलमारी येथे तब्बल 25 बैल दगवल्याची घटना देवलमरी येथे घडले असून आज पहाटे सदर घटनेची माहिती शेतकऱ्यांना मिळाली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर खूप मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. मागील चार दिवसापासून गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने सर्व नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे. देवलमरी ते वेंकटापूर मार्गावर चरायला गेलेले शेतकऱ्यांचे बैल मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. यामध्ये अनेक शेतकर्यांचे मोठे नुकसान झालं आहे. 25 जनावर च्या वर मृतावस्थेत मिळाले असून आणखी असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. या परिसरात विजेचे तार खाली लोंबत असल्याने नदी,नाल्याचा प्रवाहाला स्पर्श झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या गावकऱ्यांनी वीज खंडित करून शोधमोहीम राबविल्याची माहिती आहे.नेमकं कशामुळे बैलांचा मृत्यू झाला हे तर शवविच्छेदन केल्यावरच समजणार आहे.मात्र,या घटनेने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. प्रशासनाने त्वरित मोका पंचनामा,शवविच्छेदन करून आर्थिक मदत देण्याची मागणी केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *