Jaimaharashtra news

पंतप्रधान मोदींची प्रशंसा करणं ‘या’ नेत्याला पडलं महागात, पक्षाकडून निलंबन

पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसांपूर्वी सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते.

त्यावेळी त्यांच्या हस्ते 30 हजार घरांच्या प्रकल्पाचं भूमीपूजन करण्यात आलं.

तसेच शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर त्यांची जाहीर सभादेखील झाली.

सोलापूरमध्ये झालेल्या या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा करणे सीपीआयएमचे नेते नरसय्या आडम यांना महागात पडलं आहे.

कारण शिस्तभंगाची कारवाई म्हणून पक्षाने केंद्रीय समितीतून त्यांचे 3 महिन्यांसाठी निलंबन केले आहे.

नरेंद्र मोदींच्या या सभेत 30 हजार विडी कामगारांचा गृहनिर्माण प्रकल्प मार्गी लावल्याबद्दल सीपीआयएमचे नेते नरसय्या आडम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे व्यासपीठावरुन जाहीर आभार मानले होते.

 

 

Exit mobile version