Thu. Jul 9th, 2020

डोंगराला पडतायत भेगा, खचतेय जमीन, ग्रामस्थांवर भीतीचं सावट!

गेल्या 20 दिवसांपासून उत्तर पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र आता खेड तालुक्यातील आव्हाट मधील दरेवस्ती येथे डोंगरालाच मोठ्या आणि खोल भेगा पडून जमीन खचू लागली आहे. त्यामुळे येथील वस्तीला भूस्खलन होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण परसले आहे.

डोंगरावरील जमिनीच्या भेगा दिवसेंदिवस वाढत आहेत.

पावसाचे प्रमाण अजूनही कायम असल्यामुळे डोंगराचं भूस्खलन होण्याचा मोठा धोका आहे .

त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून प्रशासनाने तत्काळ उपयोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहे.

आव्हाट गावातील डोंगरावर भूस्‍खलन होण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने खेड तहसीलदार सुचित्रा आमले यांना परिस्थितीची माहिती घेऊन या भागाचा पंचनामा करण्याचे आदेश तलाठी सर्कल यांना दिले आहेत.

हा अहवाल भूसंशोधन विभागातील अधिकाऱ्यांकडे पाठवल्यानंतर या भागाची भूसंशोधन विभागाकडून पाहणी केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *