Jaimaharashtra news

…आणि पाकिस्तानने स्वतःच्याच सैनिकाला ठेचले

पाकिस्तानचा खोटारडेपण पुन्हा एकदा उघडकीस आला आहे.

भारतीय पायलट समजून पाकड्यांनी स्वतःच्याच सैनिकाला ठेचून मारल्याची माहिती आहे.

शाहाजुद्दिन असे या दुर्दैवी पाकिस्तानी सैनिकाचे नाव असून पाकिस्तानी जमावाने शाहाजुद्दिनला भारतीय सैनिक समजून मारहाण केली.

पाकिस्तानी सैनिक असल्याचे लक्षात आल्यानंतर शाहाजुद्दिन यांना जखमी अवस्थेत रूग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती. शाहाजुद्दिन यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

नेमकं काय घडलं?

भारतीय विंग कमांडर अभिनंदन यांनी मिग 21 या लढाऊ विमानाने पाकिस्तानचे एफ 16 विमान पाडले.

यावेळी पाकिस्तानी विंग कंमाडर शाहाजुद्दिन यांनी अभिनंदन  यांच्या विमानावर हल्ला केला.

यामुळे मीग 21 क्रॅश झाले मात्र सोबतच पाकिस्तानी पायलट शाहाजुद्दिन यांचे विमान  देखील कोसळले.

दोन्ही विमानं क्रॅश झाल्यानंतर भारतीय आणि पाकिस्तानी हे दोन्ही पायलट पाकिस्तानी हद्दीत पॅरशुटच्या सहाय्याने वेगवेगळ्या ठिकाणी खाली आले.

पाकिस्तानी पायलट शाहाजुद्दिन यांना स्थानिक रहिवाशांनी भारतीय पायलट म्हणून जबर मारहाण केली. आणी त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानच्या ताब्यात सापडले तेव्हा पाकिस्तानने दोन हिंदुस्थानी सैनिक ताब्यात असल्याचा दावा केला होता.

मात्र भारताने आपला एकच कमांडर बेपत्ता असल्याचे म्हटले होते.

त्यामुळे दुसरा कमांडर हा पाकिस्तानी असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी  भारताचा एकच पायलट आपल्याकडे असल्याची सारवासारव केली.

शाहाजुद्दिन पाकिस्तानच्या 19 स्क्वॉड्रनचे अधिकारी होते.

शाहाजुद्दिन यांचे वडिलही पाकिस्तानचे एअर मार्शल होते.

शत्रू राष्ट्राच्या ताब्यात राहून देखील विंग कंमाडर अभिनंदन सुखरूप मायदेशात परत आले.

तर पाकिस्तानी विंग कंमाडर शहाजुद्दिन हे स्वतःच्या लोकांकडून मारले गेले.

 

 

Exit mobile version