Tue. Mar 26th, 2019

भुताटकीचा उत्सव ‘हॅलोविन’!

0Shares

हॅलोविन उत्सवाची क्रेझ आता भारतातही वाढायला लागली आहे. अमेरिका, युरोपमध्ये अनेक वर्षांपासून साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात भुतांचा भीतीदायक पोशाख परिधान करण्याची पद्धत असते. या काळात भूतं आणि आत्मे जमिनीवर वावरत असतात, अशी मान्यता आहे. त्यावेळी आपण भुताटकीचं रूप धारण केल्यास खरी भूतं आपल्या जवळ फिरकत नाही, असं मानलं जातं.

 

या हॅलोविन सणात भुतांचा पोशाख करुन वेगवेगळे भयानक मुखवटे लावून आनंदोत्सव साजरा करतात.

चित्रविचित्र घाबरवणारा मेकअप या वेळी केला जातो.

त्याचप्रमाणे भोपळ्यावर नाक, डोळे, तोंड कोरुन आतमध्ये मेणबत्ती पेटवली जाते.

या दिवशी लहान मुलं ‘ट्रिक ऑर ट्रिट’ म्हणत घरोघरी जाऊन चॉकलेट्स मागतात.

halloween-hero-1.jpg

भारतातही आता या सणाचा आनंद लूटला जाऊ लागलाय. वेगवेगळ्या ठिकाणी खास हॅलोविन पार्ट्यांचं आयोजन करण्यात येतं. मुंबईजवळच्या कर्जत येथील कलोटे मोकाशी परिसरातील सबरवाल फार्मवर हॅलोविन सणांची धमाल लोकांना अनुभवता आली.

IMG_20181027_185236.jpg

या ठिकाणी जाताना प्रथम राफ्टिंग बोटच्या साहाय्याने नदी ओलांडून कॅम्पवर पोहोचावं लागलं. कॅम्पवर डेकोरेशनही भूताटकीची वातावरणनिर्मिती करणारं होतं. त्यातून ओपन थिएटर मध्ये हाॅरर सिनेमाही दाखवण्यात आला. रात्री बार्बेक्यू डिनर, रात्री जंगलात थरारक ट्रेकिंगची मजाही लुटण्याची सोय करण्यात आली होती.

WhatsApp_Image_2018-10-29_at_11.33.50_AM.jpeg

 

सकाळी हॉर्स रायडिंग, आणि पर्यटकांसाठी मासेमारी करण्याची सोय देखील याठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आली होती. खेळण्यासाठी बॅडमिंटनसह विविध प्रकारचे खेळ उपलब्ध करुन देण्यात आले होते.

IMG_20181027_174504.jpg

भूतांशी संबंधित असला, तरी हा उत्सव आनंदासाठी आणि मजा म्हणूनच साजरा केला जातो. काही ‘हटके’ मेक-अप आणि गेट-अप करून लोकांना घाबरवण्याची मजा या उत्सवाच्या निमित्ताने करायला मिळते. त्यामुळेच हा उत्सव केवळ पाश्चात्य देशांपुरता मर्यादित न राहाता आता भारतातही लोकप्रिय होतोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *