Sun. Aug 1st, 2021

राष्ट्रकुल कॉमनवेल्थ खेळामध्ये महिला क्रिकेटचा समावेश

2022 मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल कॉमनवेल्थ खेळामध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. बर्मिंघम मध्ये हे खेळ होणार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनने याची घोषणा केली आहे. यात ८ आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघ सहभागी होणार आहेत. त्यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कॉमनवेल्थ खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश

बर्मिंघम येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ खेळामध्ये महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये कॉमनवेल्थ खेळात महिला टी-२० चा समावेश करण्यात आला. यात ८ आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघ सहभागी होणार आहेत. 2022 मध्ये हे सामने होणार आहेत

यापूर्वी 1998 मध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. यानंतर 2022 पहिल्यांदा समावेश करण्यात आला आहे. 1998 मधील सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने वनडे सामन्यात सुवर्णपदक जिंकले होते. त्यावेळी जॅक्स कॅलिस, रिकी पाँटिंग आणि सचिन तेंडुलकर हे क्रिकेटमध्ये सहभागी झाले होते.

कॉमनवेल्थ गेम्समध्ये क्रिकेटच्या सामन्याला 27 जुलैपासून सुरुवात होणार असून ते 7 ऑगस्टपर्यंत पार पडणार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनने याची घोषणा केली आहे. क्रिकेटचा समावेश कॉमनवेल्थ खेळात समावेश करण्यात आल्याने हा ऐतिहासिक दिवस आहे. असं क्रिकेटप्रेमींच म्हणणं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *