Fri. Aug 12th, 2022

MS DHONI घेणार टी-20 च्या रणसंग्रामातून निरोप?

बंगळूर, भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया शेवटच्या ट्वेंटी-20 सामन्यात भारतीय संघांचा कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीला विजयाने निरोप देण्यात अपयशी ठरला.

ऑस्ट्रेलियाने  7 विकेट राखून भारताला पराभूत केलं आणि मालिका 2-0 अशी जिंकली.

पण अखेरच्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामन्यात धोनीनं चाहत्यांना नाराज नाही केलं, त्यानं 23 चेंडूत 40धावांनी खेळी केली आणि त्यात 3 षटकार व 3 चौकारांचा समावेश होता.

मैदानावर त्याचे आगमन होताना आणि तो बाद झाल्यानंतर पेव्हेलियनमध्ये येताना चाहत्यांनी एकच टाळ्यांच्या कडकडात त्याचे आभार मानले.

धोनीचा हा अखेरचा ट्वेंटी-20  सामना नव्हता, पण आगामी वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनी निवृत्त होणार अशी चर्चा आहे.

असं झालं तर बंगळूर येथे बुधवारी झालेला सामना हा धोनीचा अखेरचा आंतरराष्ट्रीय ठरु शकतो.

धोनी एक उत्तम खेळाडू

भारताचा माजी कर्णधार धोनीनं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात बुधवारी एका विक्रमाला आलिंगन दिलं.

त्यानं आंतरताष्ट्रीय क्रिकेटमध्ये 350 षटकार काढण्याचा विक्रम केला.

अशी कामगिरी करणारा MS DHONI  हा पहिलाच खेळाडू आहे.

भारताच्या 4 बाद 190 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलनं नाबाद 113 धावा चोपल्या.

त्याच्या या खेळीवर ऑस्ट्रेलियाने 19.4 षटकांत 3 बाद 194 धावा करत मालिका 2-0 जिंकली.

रिषभ पंत बाद झाला, तेव्हा धोनी मैदानावर उतरला असता चाहत्यांनी एकच धोनीच्या नावाचा जल्लोष केला.

 

बंगळूरच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर धोनीची बॅट चांगलीच गाजली आहे.

त्यामुळे बंगळूरच्या चाहत्यांचा तो नेहमीच फेव्हरेट राहिला.

भारतीय संघ वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आता एकही आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामना खेळणार नाही.

कारण धोनीनं निवृत्तीनंतर अखेरचा सामना खेळण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे हा त्याचा अखेरचा सामना ठरू शकतो, ही कल्पना चाहत्यांना होती.

यासाठी चाहत्यांनी धोनीचं जोशात स्वागत केलं.

पहिल्या सामन्यातील मंद खेळीमुळं त्याच्यावर भरपूर टीका झाली.

पण टीका करणाऱ्यांना धोनीनं बुधवारी 352 षटकार काढून चांगलंच उत्तर दिलं.

सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या फलंदाजांमध्ये तो 5 व्या स्थानावर आहे.

या क्रमवारीत वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल (506) आघाडीवर आहे.

त्याच्यामागे शाहिद, आफ्रिदी,ब्रेंडन मॅकलम आणि सनथ जलसूर्या यांचा क्रमांक लागतो.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.