Tue. Jun 18th, 2019

विराट ‘या’ कारणाने होतोय ट्रोल

0Shares

भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातला ताईत आहे. मात्र आता क्रिकेटप्रेमींनीच त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.विराटने नुकतंच एक अॅप लाॅंच केलंय. मात्र या अॅपमधील एका व्हिडिओमुळे विराट वादात अडकला आहे. ज्या भारतीयांना दुसऱ्या देशातील खेळाडू आवडतात त्यांनी देश सोडून द्यावा.” असं विधान त्याने केलंय. यामुळे अनेक लोक त्याच्यावर नाराज झाले आहे.

विराट कोहलीने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने विराटने ५ नोव्हेंबरला एक अॅप लाँच केला. या अॅपमधील एक व्हिडिओमुळे विराट ट्रोल झाला आहे. एक चाहत्याने इंस्टाग्रामवर “विराट हा ओव्हर रेटेड बॅट्समॅन आहे. मला त्याच्या बॅटिंगमध्ये काही विशेष दिसत नाही. त्यामुळे मला भारतीयांपेक्षा आॅस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या खेळाडूंची फलंदाजी पाहण्यास आवडते. “असे लिहिलं होतं

याला प्रत्युत्तर देताना कोहलीने या चाहत्याला उत्तर दिलंय, “बरं, असं असेल तर तुम्हाला भारतात राहण्याची गरज नाही. तुम्हाला त्याच देशात जाऊन राहिलं पाहिजे. तुम्ही आमच्या देशात राहुन दुसऱ्या देशांबद्दल प्रेम का व्यक्त करत आहात?’ ‘मला यामुळे कोणतीही अडचण नाही. पण तुम्हाला मी आवडत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की, तुम्ही भारतात राहुन दुसऱ्या गोष्टीवर प्रेम करावं, तुम्हाला तुमच्या मर्यादा आखून घेतल्या पाहिजे’ असा सल्लाही विराटने दिला.

विराटचा हा सल्ला चाहत्यांना आवडला नाही. केवळ दुसऱ्या देशाचा खेळाडू आवडतो म्हणून आम्ही देश का सोडून जावा, असा सवाल चाहत्यांनी विचारला आहे.

 

 

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *