Thu. Sep 29th, 2022

पोलिसांचे दावे फोल, नाशिकमध्ये महिनाभरात 6 हत्या

अवघ्या एका महिन्यात नाशिक शहरात तब्बल सहा हत्येच्या घटना घडल्याने नाशिककर चांगलेच भयभीत झाले आहे. शहरातील याच वाढत्या गुन्हेगारीने शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय. पण शहर पोलिस मात्र सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये व्यस्त असल्याचा आरोप नागरिक करत आहे.

नाशिक पोलिसांनी महिनाभरापूर्वी आढावा परिषद घेत शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात असल्याचा दावा केला होता. मात्र नाशिक पोलिसांचा हा दावा फोल ठरला आहे. अवघ्या महिनाभरात नाशिक शहर पोलिसांच्या हद्दीत सहा हत्येच्या घटना घडल्या आहे.


महिनाभरात गुन्हेगारीच्या खळबळजनक घटना
!

8 जानेवारी ते 8 फेब्रुवारी दरम्यान नाशिक शहरात हत्येच्या 6 घटना

गंगापूर,इंदिरानगर,मुंबई नाका,उपनगर,नाशिक रोड पोलीस ठाण्यात प्रत्येकी एका खुनाच्या गुह्याची नोंद..

8 जानेवारीला व्यवसायिक अभिनव शिंदेची लुटीच्या उद्देशाने त्याच्या मुलासमोर निर्घृण हत्या..

याच दिवशी कॉलेजरोड भागात एका व्यवसायिक इमारतीवर पायल परदेशी या युवतीचा गळा आवळून खून

त्यानंतर भद्रकालीत अरबाज पठाणची हत्या

उपनगरात रोहित वाघ या युवकाचा टोळक्याच्या हल्ल्यात खून

शुक्रवारी अंबड परिसरात भरदुपारी रोहित गांडुळे या तरुणाची भर चौकात निर्घृण हत्या

रविवारी मध्यरात्री सराईत गुन्हेगार गजानन गावित याची गळा चिरुन हत्या

हत्येच्या थरारक घटना

8 जानेवारी – अविनाश शिंदे

 

8 जानेवारी – पायल परदेशी

 

15 जानेवारी – रोहित वाघ

 

15 जानेवारी – अरबाज खान

 

8 फेब्रूवारी – वैभव गांडूळे

 

10 फेब्रूवारी – गजानन गावित

 

8 जानेवारी – पायल परदेशी

 

15 जानेवारी – रोहित वाघ

 

15 जानेवारी – अरबाज खान

 

8 फेब्रूवारी – वैभव गांडूळे

 

10 फेब्रूवारी – गजानन गावित

 

नागरिक स्नेही पोलिसिंगआता बास!

या घटनांमुळे शहर हादरून गेलं आहे. मात्र या हत्येच्या घटना घडूनही पोलिस मात्र या हत्येच्या घटना किरकोळ कारणातून घडत असल्याचा दावा करत आहेत.

पोलीस हा दावा करत असले तरी पोलिसांना रस्त्यावरील गुन्हेगारी रोखण्यात अपयश आल्याचंच दिसून येतंय.

‘नागरिक स्नेही पोलिसिंग’वर भर देत विविध सामाजिक उपक्रम राबवणारे नाशिक पोलीस आपल्या मूळ उद्देशापासून भरकटत असल्याचा आरोप नाशिककर आता करू लागले आहे.

धार्मिक आणि अध्यात्मिक शहर अशी खरी नाशिकची ओळख आहे.

मात्र गेल्या काही दिवसांपासून हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, टोळीयुद्ध अशा गुन्ह्यांची नोंद वाढल्याने नाशिककर भयभीत झाले आहेत.

त्यामुळे आता नाशिक पोलिसांनी ‘नागरिक स्नेही पोलिसिंग’ सोडून गुन्हेगारांना दंडुक्याची पोलिसिंग दाखविण्याची गरज निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.