पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथील 4 वर्षांच्या चिमुकलीवर 65 वर्षीय नराधमाने अत्याचार करून तिची हत्या केली. ही घटना 1 मे रोजी घडली असून या घटनेने संपूर्ण राज्यात हळहळ आणि तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणातील आरोपी भीमाजी कांबळे हा आधीपासूनच विकृत आणि गुन्हेगारी मानसिकतेचा असल्याचे समोर आले आहे. त्याने याआधी देखील दोन गुन्हे केले आहेत. ज्यातून त्याची सुटका झाली होती.
हेही वाचा- Pravin Tarde On Pune Bhor Crime Update: "त्या नराधमाचे एन्काऊन्टर झाले तरच मानू, अन्यथा..." नसरापूर प्रकरणी प्रवीण तरडे संतापले, पोस्ट करत दिला थेट इशारा
आरोपी भीमाजी कांबळे याच्यावर याआधी दोन गुन्हे दाखल होते. आरोपी भीमाजी कांबळेची या दोन्ही गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झाली होती. पुराव्याअभावी आरोपी भीमाजी कांबळेची दोन्ही गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झाली होती. 2015 ला त्याने विनयभंग आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच प्रकरणी त्याची निर्दोष मुक्तता झाली होती. दरम्यान हा आरोपी 4 वर्षाच्या चिमुकलीवरील अत्याचारा प्रकरणी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
1 मे रोजी घडलेल्या या घटनेनंतर संपूर्ण राज्यात हळहळ आणि तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच त्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येणार असून आरोपींना कठोर शिक्षा करणार असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. त्यामुळे आता या आरोपीला काय शिक्षा होते हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.