अकोला: अकोल्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मूलबाळ होत नसलेल्या एका महिलेने इंस्टाग्राम आणि फेसबुकवरून मैत्री करून एका दांपत्याचा सल्ला घेतला होता. बार्शीटाकळी येथील आसरा देवीला नवस केल्यानंतर दुसरे नवस पूर्ण करण्यासाठी जेव्हा ती महिला आळंदीला गेली, तेव्हा एका नराधमाने त्यांना लॉजवर थांबवले आणि त्यांच्या जेवणात गुंगीचे औषध टाकून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा सगळा प्रकार दाम्पत्याच्या सहाय्याने घडला होता. इतकंच नाही, तर लैंगिक अत्याचार करून त्या नराधमाने महिलेला पुण्यात सोडून दिले. या घटनेनंतर, क्षणाचाही विलंब न करता पीडित महिलेने अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी पोलिसांना हा सर्व प्रकार सांगून तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी सुरेश पाचपोरसोबतच बुलढाणा जिल्ह्यातील नागेश हिवराळे आणि ज्योती हिवराळे या दांपत्यांना देखील अटक केली.
नेमकं प्रकरण काय?
इंस्टाग्राम आणि फेसबुकवरून केलेली मैत्री अकोल्यातील एका महिलेस महागात पडली आहे. मुलबाळ न झाल्यामुळे चिंतित महिलेने बुलढाणा जिल्ह्यातील नागेश आणि ज्योती हिवराळे या दांपत्याचा सल्ला घेतला होता. तथापि, त्यांच्या 'नवसाचे' सल्ले आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलेला सापळ्यात अडकवले गेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. त्या दांपत्याने महिलेला अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील दोनद येथील आसरा देवी मंदिरात जाऊन नवस करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर दुसऱ्या नवसासाठी तिला आळंदीला नेण्यात आले. नंतर, दाम्पत्याच्या मदतीने सुपेश पाचपोर नावाच्या नराधमाने त्या महिलेच्या जेवणात गुंगीचे औषध टाकले आणि तिला बेशुद्ध केले. त्यानंतर त्या नराधमाने त्या महिलेला लॉजवर नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेनंतर पीडित महिलेला पुण्यात सोडून दिले. घडलेला हा प्रकार लक्षात येताच क्षणाचाही विलंब न करता पीडित महिलेने धाडस करून अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध कारवाई करत आरोपी सुपेश पाचपोर यांच्यासह नागेश आणि ज्योती हिवराळे या दांपत्याला अटक केली, अशी माहिती बार्शीटाकळीचे ठाणेदार दीपक वारे यांनी दिली.