नंदुरबार : नंदुरबारमधील एका नामांकित शाळेत पाचवीत शिकणाऱ्या दहा वर्षीय मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवण्याचा धक्कादायक प्रकरण समोर आला आहे. शाळेत कंत्राटी सफाई कामगार असलेल्या एका इसमानं विद्यार्थीला व्हिडिओ दाखवत असल्याचं सीसीटीव्हीत चित्रित झालं आहे. या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीला अटक करण्यात आली. दरम्यान शाळेवर घटना लपवण्याचा आरोप होत आहे. त्यामुळे पोलीस शाळेची झाडाझडती घेणार असून दोषी आढळल्यास शाळेवर गुन्हा दाखल होणार आहे.