पुणे : मे महिन्यात पुण्यातील डहाणूकर कॉलनी परिसरात एकमेकांकडे बघितल्यावरून भांडण झाले होते.त्याचवेळी एका तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले होते. या हल्ल्यात त्याचा मृत्यू देखील झाला होता. श्रीनिवास वतसलवार असे या तरुणाचे नाव होते. ज्या तरुणांनी श्रीनिवास वर हल्ला केला त्यापैकी सागर चव्हाण एक होता. बुधवारी पुण्यातील किरकटवाडी भागात सागर चव्हाण याला एका मित्राने बोलवून घेतलेले असताना त्याच्यावरच वार करण्यात आले. या हल्ल्यामध्ये सागर चव्हाण गंभीर जखमी झाला असून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.