अमरावती : परभणी जिल्ह्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधानाची तोडफोड एका व्यक्तीकडून करण्यात आली. या घटनेने परभणीत आंबेडकरांच्या अनुयायांकडून आंदोलने करण्यात आली. या घटनेचे अमरावती शहरात संतप्त पडसाद पाहायला मिळत आहे. अमरावती जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात भीम ब्रिगेड आंदोलन करण्यास सुरूवात केली.
संविधानाचा अवमान करणाऱ्या माथेफिरूचा अमरावतीत प्रतिकात्मक पुतळा जाळला आहे. अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात भीम ब्रिगेडने आंदोलन केले आहे. संविधानाचा अवमान करणाऱ्या आरोपीला कडक शिक्षा देऊन फासावर लटकवण्याची मागणी भीम ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. राज्य सरकारने परभणी प्रकरणाची दखल घेऊन सखोल चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही भीम ब्रिगेडकडून करण्यात येत आहे.
परभणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ असणाऱ्या संविधानाची एका अज्ञात व्यक्तीकडून तोडफोड करण्यात आली. त्यानंतर परभणीतील आंबेडकरांचे अनुयायांचा संताप पाहायला मिळाला. आंबेडकरांच्या अनुयायांकडून परभणीत आंदोलनाला सुरूवात झाली. त्यांच्याकडून दुकानासमोरील साहित्य आणि गाड्यांची तोडफोड झाली. तसेच भीम अनुयायांनी जाळपोळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर परभणीतील परिस्थिती चिघळली. परभणीत मोठा पोलिस बंदोबस्त करण्यात आला. आंबेडकरांचा अवमान झाल्यामुळे परभणीत बंदची हाक देण्यात आली. परभणीतील परिस्थितीवर पोलिसांचे लक्ष होते. पोलिसांकडून आंदोलन करणाऱ्या आंबेडकरी जनतेवर सौम्य लाठीचार्ज देखील करण्यात आला.
परभणीत घडलेल्या घटनेचे परभणीसह हिंगोली आणि आता अमरावतीत पडसाद उमटल्याचे पाहायला मिळत आहेत. परभणीत घडलेली घडना अत्यंत वाईट आहे.
परभणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असणाऱ्या परिसरात एका व्यक्तीकडून संविधानाच्या प्रतीची विटंबना करण्यात आली. यामुळे आंबेडकर अनुयायी प्रचंड संतप्त झाले. आंबेडकरांचे अनुयायी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा परिसरात जमा झाले. त्यानंतर त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. संतप्त आंदोलकांनी पाईप पेटवले. दुकानाबाहेरील साहित्य आणि बोर्डची तोडफोड केली. एवढेच नाही तर जमावाकडून पोलिसांच्या दिशेने दगडफेक देखील करण्यात आली. परभणीतील बंदाला हिंसक वळण आले आहे. परभणी शहरात मोठा पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे. पोलिसांकडून घटनेवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलिसांकडून जमावावर सौम्य लाठीचार्ज करण्यात आला आहे. आंदोलकांनी दुकानं आणि वाहनांवर दगडफेक केल्याने आंदोलक आणि पोलिस आमने सामने आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर आंदोलकांकडून जाळपोळ करण्यात आली आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.