Tuesday, March 17, 2026 02:37:19 PM

Crime news : देश हादरला! 'त्या' कारणावरून पालक रागावले.. 4 मुलींनी असं पाऊल उचललं की.. बसेल धक्का

पालकांच्या रागावण्यामुळे दुखावलेल्या पाचही मुलींनी शेतात जाऊन विष खाल्ले. यात 4 मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर, एक मुलगी सुदैवाने वाचली. तिनेत सांगितलेल्या माहितीवरून या भीषण प्रकाराचा उलगडा झाला.

crime news  देश हादरला त्या कारणावरून पालक रागावले 4 मुलींनी असं पाऊल उचललं की  बसेल धक्का

Bihar Aurangabad 4 Girls Suicide : बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातील हसपुरा परिसरात एका दलित वस्तीत मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. 29 जानेवारी 2026 रोजी गावातील 10 ते 14 वर्षे वयोगटातील 5 मुलींनी एकत्रितपणे विष प्राशन केले. पोलीस अधीक्षक अंबरीश राहुल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलींना त्यांच्या घरातील मोठ्यांनी मुलांसोबत जास्त मिसळल्याबद्दल आणि मुलांशी बोलल्याबद्दल कडक शब्दांत हटकले होते. या रागावण्यामुळे दुखावलेल्या पाचही मुलींनी शेतात जाऊन विष खाल्ले. यामध्ये 4 मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला; तर, एक मुलगी सुदैवाने वाचली असून तिनेच या भीषण वास्तवाचा उलगडा केला. यातच आणखी धक्कादायक म्हणजे, घाबरलेल्या कुटुंबियांनी शवविच्छेदन न करताच मृतदेहावर अंत्यसंस्कार केले होते.

बचावलेल्या मुलीने सांगितला बिहारचा 'तो' भयंकर प्रकार
औरंगाबादमधील घटनेत वाचलेल्या मुलीने सांगितले की, घरातील लोकांकडून सतत बोलणी खावी लागत असल्यामुळे त्या सर्वजणी वैतागल्या होत्या. मुलांशी मैत्री असणे हा गुन्हा असल्यासारखे त्यांना वागवले जात होते. त्या दिवशी घरातून खेळायला जातो असे सांगून त्या निघाल्या आणि रागाच्या भरात त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. पोलीस या प्रकरणात आता पालकांचीही चौकशी करत आहेत. संशयास्पद बाब अशी की, घटनेनंतर दोन दिवस पोलिसांनी ही माहिती दडवून ठेवली होती आणि गावकऱ्यांनीही यावर मौन पाळले होते.

हेही वाचा - Canada School Shooting: कॅनडा हादरलं! शाळेत अंदाधुंद गोळीबार, 10 जणांचा मृत्यू तर 25 जखमी; हल्लेखोरानेही संपवलं जीवन

गाझियाबाद: 'के-पॉप' आणि 'कोरियन ड्रामा'च्या वेडापायी 3 सख्ख्या बहिणींची उडी
काही दिवसांपूर्वी समोर आलेली उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये घडलेली दुसरी घटना अधिकच विचित्र आणि धक्कादायक आहे. येथे 16, 14 आणि 12 वर्षांच्या तीन सख्ख्या बहिणींनी रात्री 2 वाजता इमारतीच्या 9 व्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवले. पोलिसांना घटनास्थळी एक डायरी सापडली असून, त्यातून त्यांच्या 'कोरियन कल्चर' (K-Pop) प्रति असलेल्या टोकाच्या वेडाचा खुलासा झाला. या मुलींना दक्षिण कोरियात जाऊन तिथेच स्थायिक व्हायचे होते, मात्र वडील त्यांच्या या छंदाला विरोध करत असल्याने त्या प्रचंड तणावात होत्या. "सॉरी पापा, कोरियन ही आमची जान होती," असा उल्लेख त्यांच्या सुसाईड नोटमध्ये आढळला आहे.

संपूर्ण समाजासाठी आणि पालकांसाठी धोक्याची घंटा
मुले आणि मुली यांच्यातील मैत्री किंवा हल्ली मुलांमध्ये वाढत चाललेले सोशल मीडियाचे वेड यांसारख्या विषयांवरून घराघरात होणारे वाद प्रसंगी किती भयानक वळण घेऊ शकतात, याचा अनेकांना अंदाज येऊ शकतो. अशाच घटना आणि यानंतर पुढे आलेले धक्कादायक प्रकार समाजावरील गंभीर परिणाम दर्शवणारे आहेत. वरील दोन्ही घटनांमधून याची दोन अत्यंत हृदयद्रावक उदाहरणे समोर आली आहेत. बिहार आणि गाझियाबादमध्ये घडलेल्या या घटनांनी संपूर्ण देश सुन्न झाला आहे.

मानसोपचार तज्ज्ञांचे मत
या दोन्ही घटना पालकांसाठी मोठी धोक्याची घंटा मानल्या जात आहेत. मुलांच्या आवडी-निवडी किंवा त्यांच्या सामाजिक वागण्यावर निर्बंध घालताना त्यांच्याशी योग्य प्रकारे संवाद साधणे किती गरजेचे आहे, हे यातून स्पष्ट होते. तसेच, आवश्यक तेथे पालकांनी मुलांशी संवाद साधताना संबंधित विषयातील तज्ज्ञांची मदत घेण्याची गरजही अधोरेखित होते. गाझियाबादमधील बहिणींनी शाळेत जाणेही बंद केले होते आणि त्या पूर्ण वेळ मोबाईलवर कोरियन कंटेंट पाहत असत. मोबाईलचे व्यसन आणि कुटुंबाचा विरोध यातून निर्माण झालेल्या नैराश्याने एकाच वेळी तीन उमलत्या कळ्या खुडल्या गेल्या. दोन्ही राज्यांचे पोलीस या प्रकरणांचा सखोल तपास करत असून, मुलांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

हेही वाचा - Crime News : काळजाचा थरकाप! एकाच कुटुंबातील 5 जणांच्या आयुष्याचा असा शेवट; भिंतीवरच्या 'त्या' मजकुराने पोलिसही चक्रावले


सम्बन्धित सामग्री