Thursday, September 12, 2024 12:17:42 PM

Badlapur Case
अक्षय शिंदेंला न्यायालयीन कोठडी

बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी अक्षय शिंदे अटकेत आहेत. आरोपी अक्षय शिंदेची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे.

अक्षय शिंदेंला न्यायालयीन कोठडी

बदलापूर : बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी अक्षय शिंदे अटकेत आहेत. आरोपी अक्षय शिंदेची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. न्यायालयाने अक्षयला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. 

बदलापूर प्रकरणात पुढील तपास आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथक करत आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाकडून बदलापूर प्रकरणी जलद गती न्यायालयात खटला चालवण्यासाठी प्रस्ताव मागवण्यात आला आहे. बदलापूर प्रकरणी हलगर्जी केल्याचा ठपका ठेवून स्थानिक पोलीस ठाण्यातील काही अधिकारी आणि कर्मचारी यांचे निलंबन करण्यात आले आहे. 


सम्बन्धित सामग्री