Tuesday, November 11, 2025 10:09:25 PM

मोठी बातमी! मुंबईतील आर ए स्टुडिओत अभिनयाच्या नावाखाली मुलांना ओलीस ठेवलं; यूट्यूबरचं धक्कादायक कृत्य

शहरातील प्रसिद्ध आर ए स्टुडिओमध्ये अभिनयाच्या क्लासच्या नावाखाली अनेक मुलांना ओलीस ठेवण्यात आलं, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. सकाळी सुमारे 100 हून अधिक मुलं ऑडिशनसाठी स्टुडिओत आली होती.

मोठी बातमी मुंबईतील आर ए स्टुडिओत अभिनयाच्या नावाखाली मुलांना ओलीस ठेवलं यूट्यूबरचं धक्कादायक कृत्य

RA Studio In Mumbai: मुंबईत गुरुवारी सकाळी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. शहरातील प्रसिद्ध आर ए स्टुडिओमध्ये अभिनयाच्या क्लासच्या नावाखाली अनेक मुलांना ओलीस ठेवण्यात आलं, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. सकाळी सुमारे 100 हून अधिक मुलं ऑडिशनसाठी स्टुडिओत आली होती. त्या दरम्यान, रोहित आर्य (Rohit Arya) नावाच्या व्यक्तीने 15 ते 20 मुलांना पहिल्या मजल्यावर बंदिस्त करून ठेवले, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. हीच व्यक्ती संबंधित स्टुडिओमध्ये कार्यरत असून ती यूट्यूब चॅनल चालवते.  

पोलीस, अग्निशमन दल आणि NSG कमांडो घटनास्थळी

घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस, अग्निशमन दल आणि NSG कमांडोनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्टुडिओ परिसरात नागरिकांची गर्दी झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली. अनेक तासांच्या प्रयत्नानंतर पोलिसांनी आरोपी रोहित आर्यला ताब्यात घेतलं आणि सर्व मुलांची सुरक्षित सुटका केली.

हेही वाचा - Beed Canara Bank Robbery: बीडमध्ये सर्वात मोठी चोरी, कॅनरा बँकेची भींत फोडून 18 लाख लंपास; चोरट्यांना पकडण्याचं पोलिसांसमोर चॅलेंज

मी दहशतवादी नाही, मला संवाद साधायचा आहे; आरोपीचा दावा

पोलिसांना दिलेल्या प्राथमिक चौकशीत आरोपीने स्वतःचं म्हणणं मांडलं. मी दहशतवादी नाही. माझ्या काही साध्या मागण्या आहेत. मला काही लोकांशी संवाद साधायचा आहे, प्रश्न विचारायचे आहेत, असं रोहित आर्यने आपल्या व्हिडिओ मेसेजमध्ये सांगितलं. त्याने पुढे असंही म्हटलं, मी पैशाची मागणी केलेली नाही. 1 मेपासून मी साधं उपोषण केलं होतं, पण कोणीच लक्ष दिलं नाही. त्यामुळे आता तीव्र उपोषण सुरू केलं आहे. पाणी सुद्धा घेणार नाही. मला माझ्या प्रश्नांवर उत्तर हवं आहे.

पाच दिवसांपासून सुरू होतं शूटिंग ऑडिशन

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या स्टुडिओत गेल्या पाच दिवसांपासून शूटिंग आणि ऑडिशनचं काम सुरू होतं. मात्र, आज सकाळी अचानक गोंधळ निर्माण झाला आणि आरोपीने स्वतःला स्टुडिओमध्ये बंदिस्त करून मुलांना ओलीस ठेवलं. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचताच परिस्थिती नियंत्रणात आणली. सर्व मुलं सुरक्षित आहेत. आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून पुढील चौकशी सुरू आहे, असं मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं.

घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण

घटनेनंतर आर ए स्टुडिओ परिसरात नागरिकांची आणि माध्यमांची मोठी गर्दी झाली. काही वेळ वाहतुकीवरही परिणाम झाला. पोलिसांनी परिसरात सुरक्षा वाढवून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
 


सम्बन्धित सामग्री