Friday, February 13, 2026 06:29:44 PM

Crime News: अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार; प्रियकराने घरी बोलावलं, मित्रांसह केलं असं काही की...

ही घटना रविवारी सायंकाळी घडली असून, पीडित मुलगी मंदिर परिसराच्या मागे बेशुद्ध अवस्थेत आढळून आली होती. यानंतर पीडिता तब्बल 2 दिवस बेशुद्ध होती.

crime news अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार प्रियकराने घरी बोलावलं मित्रांसह केलं असं काही की

Bihar Crime News : मधेपुरा जिल्ह्यातील सिंहेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्काराची (Gangrape) हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पीडित मुलीने दिलेल्या जबाबानुसार, रौशन कुमार नावाच्या तरुणाने तिला लग्नाचे आमिष दाखवून भेटायला बोलावले होते. मुलगी त्याला भेटायला गेली असता, त्याने तिला आपल्या घरी नेले आणि तिथे आधीच उपस्थित असलेल्या आपल्या 4 मित्रांसह तिच्यावर अत्याचार केला. या कृत्यानंतर आरोपींनी तिला सिंहेश्वर मंदिर परिसरात सोडून पळ काढला.

दोन दिवसांच्या बेशुद्धीनंतर समोर आले सत्य
ही घटना रविवारी सायंकाळी घडली असून, पीडित मुलगी मंदिर परिसराच्या मागे बेशुद्ध अवस्थेत आढळून आली होती. स्थानिक नागरिकांनी तातडीने तिला रुग्णालयात दाखल केले; मात्र, प्रकृती गंभीर असल्याने तिला तातडीने मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आले. तब्बल 2 दिवस ती बेशुद्ध होती. बुधवारी शुद्धीवर आल्यानंतर तिने आपल्यासोबत घडलेला हा भीषण प्रकार पोलिसांना सांगितला. रौशन कुमार हा शंकरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बसंतपूरचा रहिवासी असल्याचे तिने स्पष्ट केले.

हेही वाचा - Child Trafficking Racket : आंतरराज्यीय बाल तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; नवजात बाळाची सुटका, तिघांना अटक

मुख्य आरोपीला बेड्या; 4 जण फरार
पीडितेच्या जबानीनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत 'पॉक्सो' (POCSO) कायद्यांतर्गत एकूण 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मधेपुराचे पोलीस अधीक्षक (SP) संदीप सिंह यांनी माहिती दिली की, मुख्य आरोपी रौशन कुमार याला पोलिसांनी अटक केली आहे. उर्वरित आरोपींच्या अटकेसाठी पोलीस पथके ठिकठिकाणी छापेमारी करत आहेत. सिंहेश्वर मंदिर हे एक पवित्र धार्मिक स्थळ असून, तिथे रविवारी गंगा महाआरतीसाठी मोठी गर्दी असते, अशा सार्वजनिक ठिकाणी आरोपींनी पीडितेची विल्हेवाट लावण्याचे धाडस केल्याने संताप व्यक्त होत आहे.

महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
सिंहेश्वर मंदिरासारख्या गजबजलेल्या ठिकाणी ही घटना घडल्याने स्थानिक प्रशासनाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पीडितेवर सध्या उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. बिहारमध्ये महिलांविरोधातील गुन्हे वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर, या घटनेचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगवान केला असून, लवकरच सर्व नराधमांना अटक करण्याचे आश्वासन दिले आहे.

हेही वाचा - Rupali Chakankar On Pune Dipti Case : "मुलीला सासरी पाठवताना..." हुंडाबळी ठरलेल्या दीप्तीच्या कुटुंबियांची भेट घेताच चाकणकर संतापल्या


सम्बन्धित सामग्री






ताज्या बातम्या




ताज्या बातम्या